मराठी भाषा गौरव दिन दिनांक 24 मार्च 2026 रोजी साजरा केला गेला. महात्मा ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला. यासाठी पूर्व तयारी केली गेली होती.
यावर्षी विद्यार्थ्यांच्या मदतीने एका हस्तलिखिताच प्रकाशन करण्याचे ठरविले गेले. त्यासाठी काही विद्यार्थ्यांनी स्वतः मूल्यांवर आधारित गोष्टी लिहिल्या व त्यातील चित्रे अक्सा नावाच्या विद्यार्थींनीने काढलीत. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या गोष्टी पुन्हा सौ. निमिषा गुंजकर, सौ. श्रेया सारंग व अक्सा या विद्यार्थींनीने लिहिलेल्या.
दिनांक 24 मार्च रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विठोबा सावंत यांना आमंत्रित केले गेले होते. ‘माझे पान’ या हस्तपुस्तिकेच प्रकाशन डॉ. विठोबा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
मराठी भाषा ही सर्व भाषांना आपल्यामध्ये कशाप्रकारे सामावून घेते हे सौ. निमिषा गुंजकर यांनी सर्वांसमोर मांडले. तसेच काही विद्यार्थ्यांनी विविध साहित्यिकांच्या साहित्याचा परिचय करुन दिला तसेच मराठी भाषेचे महत्त्व समजावून सांगितले शेवटी मुख्याध्यापिका डॉ. रेस्मी वर्गीस यांनी भाषेचे महत्त्व स्पष्ट केले. अश्याप्रकारे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.



